Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम 4.79

4.7 star(s) from 120 votes
Radhanagari
Kolhapur, 416211
India

About Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम

Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम Radhanagari Tourism-राधानगरी टुरिझम is a well known place listed as Tours/sightseeing in Kolhapur , Tours & Sightseeing in Kolhapur ,

Contact Details & Working Hours

Details

महाराष्ट्र या निसर्गाने समृध्द असलेल्या राज्यातील कोल्हापुर या जिल्ह्यामधे राधानगरी हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी अनेक प्रदुषण मुक्त, निसर्गचा ठेवा असलेली स्थळे असुन सुध्दा योग्य प्रसिध्दी अभावी ती विकसीत झालेली नाही आहेत.म्हणुनच ह्या पर्यटन स्थळांची माहीती करुण देण्यासाठी या फेसबुक पेज ची निर्मिती केली आहे.
राधानगरी तालुक्यामध्ये छ. राजर्षि शाहु महाराजांच्या प्रेरणेतुन अनेक पर्यटन स्थळे उद्ययास आली आहेत.यामध्ये प्रामुख्याने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान पटकावलेले, गवा या प्राण्यासाठी प्रसिध्द असलेले व जैव विविधतेने नटलेले ’राधानगरी अभयारण्य’, तसेच छ. राजर्षि शाहु महाराजांनी बाधलेले, १०० वर्ष पुर्ण झालेले व स्वयंचलित ७ दरवाजे असलेले ’राधानगरी धरण’, भारतातील सर्वात जुना ’जलविद्युत प्रकल्प’, महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य प्रकल्प असलेले ’काळम्मावाडी धरण’ दुधगंगानगर, सह्याद्रीच्या कुशीत असलेले ’राउतवाडी, रामणवाडी, धबधबे’, ’तुळशी धरण’, चक्रेश्वरवाडी, सिरसे, कपिलेश्वर या ठिकाणी असलेले पुरातन ’शिव मंदिर’, महाराष्ट्र व गोवा यांना जोडणारा फोंडा घाट, कास पठाराचा आभास निर्माण करणारे इदरगंज चे फुलांचे पठार तसेच अनेक निसर्गरम्य,प्रदुषण मुक्त, प्रसिध्दी पासुन अलिप्त असलेली पर्यटन स्थळे आहेत.
हि स्थळे तुम्ही मित्र-मैत्रिणी,सहकुटुंबासह पाहु शकता.ही पर्यटन स्थळे फक्त पर्यटनच नाही तर विविध प्रकारचे निसर्ग शिक्षण पण देतात. खासकरुन विद्यार्थी व शिक्षकांनी ह्या पर्यटन स्थळाना आवर्जुन भेट द्यावी.

OTHER PLACES NEAR RADHANAGARI TOURISM-राधानगरी टुरिझम

Show more »