Spaarc Foundation 2.81

4.6 star(s) from 19 votes
AMRAVATI
Amravati, 444603
India

About Spaarc Foundation

Contact Details & Working Hours

Details

स्पार्क फौंडेशन ...चला उजेड होऊया !
SPAARC FOUNDATION..... Let’s be Light !
S – SOCIAL P – PERSONAL A – AWARENESS A – ACTIVITIES FOR R – RESOURCE C – CREATION
“ हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए।
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए। “
- दुष्यंत कुमार
गेल्या ३ वर्षांपासून स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम,साहित्यिक उपक्रम ,प्रशासकीय कामकाज,लेखापरीक्षण ई अनेक माध्यमातून महाराष्ट्रभर फिरलो.अनेक मा.मंत्री महोदय,मा.प्रशासकीय अधिकारी यांचे सोबतच मा.अण्णा हजारे,मा.विकास आमटे,मा.प्रकाश आमटे,मा. अभय बंग,मा.रवींद्र कोल्हे,मा.अविनाश सावजी,मा.आशिष सातव ई.मान्यवरांचे विचार व कार्य जवळून बघता आले....अनुभवता आले.वैयक्तिक व सामाजिक जाणीव जागृती,चांगले विचार व कार्य यांचा प्रचार, प्रसार,विधायक व सृजनशील उपक्रम अंमलबजावणी यासाठी वैयक्तिक पातळीवरून प्रयत्न करायला अनेक मर्यादा पडतात.त्यासोबत संस्थात्मक पातळीवर अधिक व्यापक,सुसंघटीत,प्रभावी व परिणामकारक प्रयत्न करण्यास वाव आहे.या सर्व विचार मंथनातून समविचारी मित्रांच्या व कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून “स्पार्क फौंडेशन ” हि NGO आकारास आली.
SPAARC (SOCIAL & PERSONAL AWARENESS ACTIVITIES FOR RESOURCE CREATION )
स्पार्क ही संस्था सामाजिक,वैयक्तिक जाणीवजागृती उपक्रमातून संसाधन निर्मिती साठी कार्यरत आहे.प्रत्येक व्यक्ती हि एक साधनसंपत्ती असून तिच्या सर्वांगीण विकासातूनच समाजाचा,देशाचा व अखिल मानवजातीचा विकास शक्य आहे. मात्र तरीही आज गरिबी,निरक्षरता,भ्रष्टाचार,आतंकवाद ई. समस्यांनी सर्व मानवजातीला त्रस्त केल्याचे दिसत आहे. स्पार्क म्हणजे स्फुल्लिंग ...ठिणगी ...! जन्मत: प्रत्येक व्यक्तीमध्ये स्पार्क असतोच ! मात्र वाढत्या वयासोबत काही मुठभर व्यक्तींमध्ये त्याची ज्योत ..ज्योतीचा सूर्य होतो...जो त्यांचे विचार व कार्य यारुपाने अखिल मानवजातीला प्रकाश...उर्जा ...दिशा...संजीवनी देतो.मात्र बहुतांश व्यक्तींमधला हा स्पार्क निस्तेज होतो...तर कधी कधी विझतोही !
स्पार्क फौंडेशन ही आपल्या सामाजिक, वैयक्तिक जाणीव जागृती उपक्रमांद्वारे प्रत्येक मनुष्याला त्याच्या उपजत क्षमतांची जाणीव करून देवून, स्वत: त्या विकसित करून त्याच्यामध्ये उर्जा,प्रेरणा निर्माण करून त्याला प्रकाशमान ( सर्वांगीण विकसित ) बनवते व इतरांना प्रकाशमान ( सर्वांगीण विकसित ) करण्याचे कार्य करण्यास प्रोत्साहन देते व प्रवृत्त करते.यासाठी प्राथमिक टप्प्यात महाराष्ट्रभर मुंबई पासून भामरागड पर्यंत विविध स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम, साहित्यिक उपक्रम, ,प्रशासकीय उपक्रम यांचे आयोजन करण्यात येवून त्यामधून प्रत्येक व्यक्ती हि एक साधनसंपत्ती असून तिच्या सर्वांगीण विकासातूनच समाजाचा,देशाचा व अखिल मानवजातीचा विकास साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
“ ख्वाइशोसे गिरते नाही फुल झोली में
वक्त की शाख को मेरे दोस्त हिलाना होगा !
कुछ नहीं होगा अँधेरे को बुरा कहकर
अपने हिस्से का दिया खुद ही जलना होगा ! ”
चला तर मग या प्रकाशमयी कार्यात सक्रीय सहभागी होऊया ! स्पार्क सोबत जोडुया ! SPAARC FOUNDATION च्या पेज, FACEBOOK ACCOUNT...YOUTUBE ACCOUNT शी सलग्न व्हा ...आपल्या शहरात... गावात आयोजित स्पार्क च्या विविध उपक्रमात सहभागी व्हा ...स्वत: प्रकाशमान व्हा ..इतरांनाही प्रकाशमान करा !
LET’S BE LIGHT …LET’S SPREAD LIGHT !

OTHER PLACES NEAR SPAARC FOUNDATION

Show more »