Z.P.Teachers Kolhapur 3.79

जिल्हा परिषद कोल्हापूर
Kolhapur, 416103
India

About Z.P.Teachers Kolhapur

Z.P.Teachers Kolhapur Z.P.Teachers Kolhapur is a well known place listed as Education in Kolhapur ,

Contact Details & Working Hours

Details

दैनंदिन आध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कप्पेबंद व साचेबंद वाटांनी न जाता शिक्षण क्षेत्रातील कालानुरूप गरज लक्षात घेऊन ग्रामीण जिल्हा परिषद शाळेत नव- नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे झाले आहे .घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक व्हावी, अध्ययन अध्यापनात रंजकता यावी, खडू फळाविरहित ओझ्याविना शिक्षण, तसेच ग्रामीण विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा, ही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून; अत्याधुनिक साधनांचा वापर करून अध्यापन करणे कालक गरज झाली आहे.संगणक, एल.सी.डी. प्रोजेक्टर, एज्युकेशनल सॉफ्टवेअर, लॅपटॉप, पॉवर प्रेजेनतेशन इत्यादी गोष्टींचा वापर केला पाहिजे.राज्यातील अनेक शिक्षक या तत्राचा वापर करताना दिसतात.आणि हे सर्व फेसबुकद्वारे आपण सर्वांना माहित करूं देउ शकतो . अशा अभिनव उपक्रमामुळे शालेय वातावरण आनंददायी होईल यात शंका नाही .तसेच यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीस असे उपक्रम उपयुक्त ठरत आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे आज खासगी शाळांकडे किंबहुना इंग्रजी शालाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. परिणामी, सरकारी,जि.प. शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. हे चित्र बदलण्याचा आमचा मानस असून, सदर उपक्रम राबवण्यासाठी लागणारा निधी शिक्षकांनी ग्रामस्थांकडून,माजी विद्यार्थी ,दानशूर व्यक्ती , तसेच गावागावांतून जमा केला तर जि.प.शाळा डिजिटल स्कूल करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.
जि.प.प्राथमिक शिक्षक कोलहापूर या ग्रुपची स्थापना केवळ विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम घेतले जातात. जसे भिंतीवर फळा- घरोघरी शाळा, बाल-आनंद मेळावा, दिंडीतून नीती शिक्षण, क्षेत्रभेटीतून प्रत्यक्ष शिक्षण, अपंग दिन, पर्यावरण दिन, वृक्षारोपण, हळदीकुंकू समारंभ, माता प्रबोधन, सामाजिक भ्रमदान, चिल्ड्रन बँक, खेलखेलमें योग, माझा वाढदिवस, विविध गुणदर्शनातून व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे अनेक उपक्रम जाणीवपूर्वक घेतले जातात. कि जयामुळे जि.प.शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असेल कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे उपक्रम सुरू असल्यास या ठिकाणी शेंयर करा हि नम्र विंनती .