Nanded Boys 3.49

5 star(s) from 1 votes
Nanded
Nanded, 431 602
India

About Nanded Boys

Nanded Boys Nanded Boys is a well known place listed as Community Organization in Nanded ,

Contact Details & Working Hours

Details

नांदेड जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील दक्षिण-पूर्वेस व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात असलेल्या नांदेड जिल्ह्याला ऐतिहासिक महत्व आहे. नांदेडात शीखांचे शेवटचे गुरु गोविंदसिंहजी महाराज यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड संतकवी विष्णूपंत व रघुनाथ आणि वामन पंडित यांचे जन्मस्थान आहे.नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय या महत्वाच्या शैक्षणिक संस्था आहेत.

नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४२२ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या इ.स २००१च्या जनगणनेनुसार २८,७६,२५९ इतकी आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान ९५३.८ मी.मी आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या- गोदावरी, मांजरा, मान्याद व पेनगंगा.नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते.

नांदेड जिल्ह्यातील तालुके- अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड (तालुक्याचे ठिकाण), नायगाव, उमरी

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- श्री गुरुगोविंदसिंह यांचा गुरुद्वारा, माहुरची रेणुकादेवी (शक्तिपीठ), बिलोली मशिद, कंधारचा किल्ला, लोहा तालुक्यातील मालेगाव यात्रा, देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदीर (होट्ट्ल) व नांदेडचा किल्ला